Join us

राज्यात एसटी शंभर टक्के बंद; दिवसभरात ५४२ जण, तर दोन दिवसांत ९१८ कर्मचाऱ्यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 8:34 AM

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे.

मुंबई : गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबतच आहे. राज्यभरातील २५० आगारांमधून बुधवारी एकही बस बाहेर पडली नाही. एसटीच्या बसेस शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. परिणामी, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मंगळवारपासून निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. दिवसभरात ५४२ जणांवर तर आतापर्यंत एकूण  ९१८  एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून मंगळवारी ३७६ तर बुधवारी ५४२ अशी आतापर्यंत ९१८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात राज्यातील ६३ एसटी आगारांतील ५४२ कर्मचारी निलंबित केले आहेत. तर राज्यातील २५० आगारांपैकी २५० आगार बंद  होते. दरम्यान, एसटी महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे संपात सहभागी होणारे कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असून, आज राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईची वाट पकडली होती. 

टॅग्स :एसटी संपमहाराष्ट्र