एसटी प्रवाशांना विषाणूपासून मिळणार सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:00+5:302021-07-31T04:07:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आपल्या दहा हजार गाड्यांना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करणार आहे. त्यामुळे ...

ST passengers will get protection from the virus | एसटी प्रवाशांना विषाणूपासून मिळणार सुरक्षा कवच

एसटी प्रवाशांना विषाणूपासून मिळणार सुरक्षा कवच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आपल्या दहा हजार गाड्यांना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणूंपासून सुरक्षा कवच मिळणार आहे. हे अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग एसटीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये केले जाणार आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे.

कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचे चाक थांबले होते. आता एसटी सुरू असली तर महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी स्पर्श करतात. ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रसाराचा धोका असतो. तो टाळण्यासाठी एसटीने बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एजन्सी निवडीसाठी निविदाही काढण्यात आली आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहे की, ते कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जीवाणूपासून संरक्षण देते.

कुठे असणार कोटिंग?

बसमधील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, ड्रायव्हर केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, पॅसेंजर दरवाजा आणि आपत्कालीन दरवाजा बाहेरील व आतील बाजू आणि सामान काक्षाची बाहेरील आणि आतील बाजूवरही अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जाणार आहे.

Web Title: ST passengers will get protection from the virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.