एसटीचे विश्रांतीकक्ष, स्वच्छतागृहे सुधारणार; दादा भुसे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:26 AM2023-03-16T07:26:18+5:302023-03-16T07:26:46+5:30
बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:एसटी बसस्थानकांमधील चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रामगृहांची तसेच महिला स्वच्छतागृहे, हिरकणी केंद्रांची सुधारणा करण्याच्या सूचना तातडीने देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.
विधानपरिषदेतन प्रश्नोत्तराच्या तासाला रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री भुसे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात सन २०१८ मध्ये वाढ करण्यात आली आहे. गावपातळीवर ७५ रुपये, जिल्हा पातळीवर ९० रुपये आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता १०० रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"