एसटी धावली रेल्वे प्रवाशांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:15+5:302021-07-23T04:06:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ...

ST rushed to the aid of railway passengers | एसटी धावली रेल्वे प्रवाशांच्या मदतीला

एसटी धावली रेल्वे प्रवाशांच्या मदतीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीने मदतीचा हात दिला. कसारा, इगतपुरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे ४ वाजता १३३ बसगाड्या सोडल्या. या बसगाड्यांमधून सुमारे ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. हे प्रवासी कसारा, इगतपुरी स्थानकात अडकून पडले होते. त्यांच्या प्रवासासाठी बस उपलब्ध कराव्यात, अशी विनंती मध्य रेल्वेने केली. त्यापाठोपाठ, स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बस उपलब्ध करून दिल्या. ही वाहतूक गुरुवारी पहाटे चार वाजेपासून करण्यात आली. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे एसटीने पुणे स्थानकातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसगाड्या जादा रवाना करण्यात आल्या.

Web Title: ST rushed to the aid of railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.