मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२०-२१ चालू आर्थिक वर्षात बदली मिळणार नाही, असा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील विभाग पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी, आर्थिक गणित सुरळीत ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभाग पातळीवर कोरोनाशी सामना करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना काळात एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२०-२१ चालु आर्थिक वर्षात बदली न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीतील आर्थिक उपाययोजना करण्याचा भाग म्हणून बदल्यांमुळे होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी एसटीने हा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, अनावश्यक बदल्या टाळण्यासाठी या वित्तीय वर्षामध्ये बदल्यासंदर्भातील निर्णय एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेनेच होणार असल्याचे ही आदेश महामंडळाने दिले आहे.