एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ४० टक्क्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:25 AM2019-12-09T04:25:43+5:302019-12-09T06:02:59+5:30

राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नसल्याने महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे.

ST staff salaries are reduced by 10 to 40 percent | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ४० टक्क्यांची कपात

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ४० टक्क्यांची कपात

Next

मुंबई : राज्यातील एसटीच्या विविध आगारांचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नसल्याने महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरे जावे लागत आहे. डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे नाहीत. पैसे उभे करण्यासाठी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पगाराची कपात केली जात आहे. परिणामी एसटी कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

ठाण्यातील कर्मचाºयांचा ४० %, साताºयात २० %, सिंधुदुर्गात ३० %, अकोल्यात ७० % आणि रत्नागिरीत १९ % वेतनात कपात केली आहे. तर, उस्मानाबाद, गडचिरोली, नांदेड, नाशिक नं१ डेपो येथील कर्मचाºयांचा पगारच झाला नाही. एसटी कामगार संघटनांनीही महामंडळाकडे तत्काळ सर्व वेतन देण्याची मागणी केली आहे. १०० टक्के वेतन न मिळाल्यास एसटी कामगार संघटनेने आंदोलन छेडण्याची भूमिका मांडली आहे.

Web Title: ST staff salaries are reduced by 10 to 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.