मुंबई : एसटीच्या चालकांमध्ये सुरक्षेबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांची तांत्रिक देखभालीसाठी मोहिम राबविण्यात आली आहे. ११ ते २५ जानेवारी या दरम्यान सुरक्षितता मोहिम राबवली जाणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितता मोहिम राबवली जाणार आहे. मागील ७१ वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हततेची भावना निर्माण झाली आहे. त्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या पार्श्वभूमीवर ‘प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य’ या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल यांनी केले.
एसटी कर्मचाऱ्यांचे होणार सुरक्षा अभियानातून प्रबोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:49 AM