ताबडतोब कामावर हजर व्हा, अन्यथा नोकरी गमवावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:49 AM2021-11-18T06:49:15+5:302021-11-18T06:50:12+5:30

एसटीतील २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना महामंडळाची नोटीस

ST Strike, Attend work immediately, or you will lose your job of msrtc | ताबडतोब कामावर हजर व्हा, अन्यथा नोकरी गमवावी लागेल

ताबडतोब कामावर हजर व्हा, अन्यथा नोकरी गमवावी लागेल

Next
ठळक मुद्देएसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती.

मुंबई : गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्याने महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यापाठोपाठ महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी २२९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.  

यांना बजावली नोटीस
चालक : २५
चालक तथा वाहक : २१०१
वाहक : १३२
सहाय्यक : २२
लिपिक टंकलेखक : १६

Web Title: ST Strike, Attend work immediately, or you will lose your job of msrtc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.