मुंबई : गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्याने महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यापाठोपाठ महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी २२९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
यांना बजावली नोटीसचालक : २५चालक तथा वाहक : २१०१वाहक : १३२सहाय्यक : २२लिपिक टंकलेखक : १६