Join us

राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी एसटी धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 6:03 PM

१० हजार एसटी बसच्या माध्यमातून नागरिक घरी जाणार

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बस धावणार आहेत. हि सेवा नागरिकांना विनामूल्य असणार आहे. मात्र यासाठी साधारण २० कोटी रुपये खर्च येणार असून हा खर्च मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून करण्यात असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवले जाणार असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या सर्वांना एसटीद्वारे त्यांच्या घरी सोडले  जाणार आहे. अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी राज्यात १० हजार एसटी बस सोडल्या जाणार आहेत. यासाठी २० कोटी रुपयांच्यावर अपेक्षित खर्च आहे. हा प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. पुढच्या दोन दिवसात राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत एसटीद्वारे सोडले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.---------------------------- 

एसटी बस सोडल्याने राज्यातील अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. ही कोरोना लढाई जिंकण्यासाठी राज्यात प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्य करत असून आपण ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. प्रशासन व शासनाच्या चांगल्या योगदानामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर आटोक्यात आला आहे.  इतर देशांच्या तुलनेत राज्य शासन कोरोना बाधितांची संख्या रोखण्यातही यशस्वी झालो आहोत. आवश्यक उपाययोजना करून आपण ही कोरोना लढाई जिंकणार आहोत. आपला देश, आपले राज्य व गाव वाचवू. राज्यातील जनतेला घरी राहा,  सुरक्षित राहा,अशी वडेट्टीवार यांनी दिली. 

 ----------------------------

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या