'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:27 PM2022-04-09T15:27:22+5:302022-04-09T15:27:40+5:30

'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं!

ST workers 'agitation went astray'; That is what BJP leader Gopichand Padalkar said! | '...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं!

'...अन् मग एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं'; गोपीचंद पडळकरांनी स्पष्टचं सांगितलं!

googlenewsNext

मुंबई- उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.

आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदोलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली होती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. जे घडलं, त्याबाबतीत पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यांचा तपास होईपर्यंत यावर काही बोलणं योग्य होणार नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो, २६ नोव्हेंबर २०२१ ला… तेव्हापासून परवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत.. तेव्हा जे आमचं ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काहीही पाच महिन्यांत घडलेलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. नंतरच्या काळात सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही, आणि सरतेशेवटी हे आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं, असंही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची पवारांशी फोनवरून चर्चा-

हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकी घटना कशी घडली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून घेतली. या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अस्वस्थता पसरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न-

आमचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यामागे राजकीय पक्ष, अज्ञात शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने चौकशी केली जाईल. - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री 

Web Title: ST workers 'agitation went astray'; That is what BJP leader Gopichand Padalkar said!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.