ST Workers Strike : कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:42 AM2021-12-02T11:42:54+5:302021-12-02T11:43:22+5:30

ST Workers Strike: परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, बुधवारी या संख्येत घट पाहायला मिळाली. मंगळवारच्या तुलनेत चारशे कर्मचारी गैरहजर होते.

ST Workers Strike: Decline in the number of ST workers returning to work, signs of intensification of strike | ST Workers Strike : कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे

ST Workers Strike : कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचारी संख्येत घट, संप पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे

googlenewsNext

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत होती. मात्र, बुधवारी या संख्येत घट पाहायला मिळाली. मंगळवारच्या तुलनेत चारशे कर्मचारी गैरहजर होते.

राज्यभरात बुधवारी १८,६९४ कर्मचारी कामावर रुजू झाले असून, कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये २१०२ चालक तर २२२४ वाहकांचा समावेश असल्याची एसटी महामंडळाकडून देण्यात आली. तर अजूनही ७३,५७२ कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान, एसटीतील राेजंदारीवरील ६५ कर्मचाऱ्यांची सेवा बुधवारी समाप्त करण्यात आली असून, एकूण संख्या १,८९२ वर पाेहाेचली आहे. तर एसटीतील नियमित सेवेत असलेल्या ८,६४३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये बुधवारी निलंबित केलेल्या ४४८ कर्मचाऱ्यांंचा समावेश आहे.

रुजू कर्मचारी संख्या

रविवारी - १८,३७५
सोमवार- १९,१६३
मंगळवार -१९,०८६
बुधवार -१८,६९४ 

Web Title: ST Workers Strike: Decline in the number of ST workers returning to work, signs of intensification of strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.