Join us

ST Workers Strike : संपात एसटीला शिवशाहीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 7:42 AM

ST Workers Strike : गेले महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून प्राप्त झाले आहे.

मुंबई: गेले महिनाभर सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामध्ये राज्यभरात काही निवडक मार्गावर शिवनेरी आणि शिवशाही या भाडेतत्त्वावरील बसेस काही प्रमाणात सुरू आहेत. या बसेसच्या माध्यमातून गेल्या १० दिवसात एसटीला तब्बल ४ कोटी रुपयांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून प्राप्त झाले आहे.

दादर-पुणे, बोरीवली-ठाणे-पुणे या मार्गावर दर तासाला एक या प्रमाणे ३५ शिवनेरी बसेस गेली १० दिवस सुरळीत सुरू आहेत. तर नाशिक-शिवाजीनगर (पुणे), सातारा-स्वारगेट (पुणे) आणि शिवाजीनगर- औरंगाबाद या मार्गावर ६० शिवशाही बसेस नियमित सुरू आहेत. या बसेसवर देखील काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तरीही न डगमगता या बसेस सुरू ठेवण्याचा प्रयत्न महामंडळाकडून सुरू आहे. असाच प्रयोग कोल्हापूर-पुणे, पुणे-जळगाव-धुळे या मार्गावर देखील करण्याचा प्रयत्न महामंडळ करत आहे.

टॅग्स :एसटी संपशिवशाही