पालिका कर्मचा-यांच्या पगाराला कात्री, काहींच्या खात्यात केवळ तीनशे रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:31 AM2018-03-04T03:31:39+5:302018-03-04T03:31:39+5:30
पालिकेतील सर्व कर्मचारी-अधिका-यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. जितक्या दिवसांची हजेरी तेवढाच पगार या हिशोबाने कर्मचा-यांचे पगार काढले जात आहेत. त्यामुळे वेळेवर हजेरी न लावणाºया तब्बल ३७ हजार कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापण्यात आल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मुंबई : पालिकेतील सर्व कर्मचारी-अधिका-यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. जितक्या दिवसांची हजेरी तेवढाच पगार या हिशोबाने कर्मचा-यांचे पगार काढले जात आहेत. त्यामुळे वेळेवर हजेरी न लावणाºया तब्बल ३७ हजार कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार कापण्यात आल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मुंबई महापालिकेतील एक लाख कर्मचाºयांना जुलै २०१७पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ३ हजार ९०० मशिन्स लावण्यात आल्या आहेत. हजेरी वेळेत न लागल्यास त्या दिवसाचा पगार मिळणार नाही, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ३१ आॅक्टोबरला परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. मात्र ३१ डिसेंबर २०१७पर्यंत सवलत देऊनही कर्मचाºयांमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात जमा झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारात मोठी कपात दिसून आली आहे. याचा फटका ३७ हजार कामगार कर्मचाºयांना बसला आहे. ते काम करीत असलेल्या विभागाने कामाचा दिनांक व वेळ यांची नोंद पुन्हा केल्यास ती रक्कम देण्याचा निर्णय होऊ शकेल.
खातेप्रमुखांची
परवानगी आवश्यक
वेळेआधी कार्यालय सोडणे, अर्धा दिवसाची रजा घेऊन त्याची नोंद न करणे तसेच कामांचे तास व वेळ नोंद न केल्यामुळे या सर्व कर्मचाºयांचे पगार कापले आहेत.
अर्धा दिवस सुट्टी किंवा सवलत घेऊन लवकर निघून जाणाºया कर्मचाºयांना त्याबाबत खातेप्रमुखांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
काही जणांचे पगार कापून त्यांच्या खात्यात केवळ तीनशे ते चारशे रुपये जमा झाले आहेत.