वर्धापन दिनीच संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:16 AM2017-08-03T02:16:59+5:302017-08-03T02:17:01+5:30
महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्ट कामगार संघटनांचे नेते उपोषणाला बसले आहेत. तर कामगारही ड्युटी संपल्यानंतर साखळी उपोषणात सामील होत आहेत.
मुंबई : महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्ट कामगार संघटनांचे नेते उपोषणाला बसले आहेत. तर कामगारही ड्युटी संपल्यानंतर साखळी उपोषणात सामील होत आहेत. तरीही या आंदोलनाची दखल संपाच्या दुसºया दिवशीही महापालिका प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये रोष पसरला आहे. त्यानुसार दोन दिवसांत तोडगा काढा, अन्यथा वर्धापन दिनीच ७ आॅगस्टपासून कर्मचारी संपावर जातील, असा इशारा संयुक्त कृती समितीने
दिला आहे.
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मध्यस्थीनंतरही पालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये पाच बैठका निष्फळ ठरल्या. त्यामुळे संतप्त कामगारांनी वडाळा बेस्ट आगारासमोर मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे; परंतु
आज संपाच्या दुसºया दिवशीही पालिका प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नाही.
महापालिकेने आर्थिक साहाय्य करावे, पगार वेळेवर द्यावा, अशी मागणी बेस्ट कामगार संघटनांनी लावून धरली आहे. मात्र, पालिका प्रशासन मदतीचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष ठेंगा दाखवत आहे.
पालक संस्था या नात्याने महापालिकेने बेस्ट उपक्रमाला मदत करणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेना आणि कृती समितीचे सुहास सामंत यांनी केला आहे. बेस्टचा वर्धापन दिन ७ आॅगस्टला साजरा होत असतानाच बेस्टचा संप पुकारण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.