स्टॅन स्वामी यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:06 AM2021-03-23T04:06:20+5:302021-03-23T04:06:20+5:30
स्टॅन स्वामी यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला स्टॅन स्वामी यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरण लोकमत ...
स्टॅन स्वामी यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
स्टॅन स्वामी यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
कोरेगाव- भीमा हिंसाचार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरेगाव - भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी (८३) यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
स्वामी यांच्या ताब्यात आक्षेपार्ह दस्तऐवज होते आणि बहिष्कार घातलेल्या संघटनेशी त्यांचे संबंध होते, हे सिद्ध करण्याइतपत तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे आहेत, असे निरीक्षण नाेंदवत तसेच शोमा सेन आणि रोना विल्सन यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत स्वामी यांचा जामीन अर्ज न्या. डी. ई. कोठळीकर यांनी फेटाळला.
स्वामी हे सीपीआय (माओवादी)च्या आघाडीच्या संघटना विस्थापनविरोधी जनआंदोलन आणि पिपल्स युनियनचे समर्थक असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे, असे विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी जामीनावर आक्षेप घेताना म्हटले. तर, स्वामी हे कोणत्याही दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असल्याचे पुरावे तपास यंत्रणेने निदर्शनास आणले नाहीत. त्यामुळे यूएपीए कायद्याचे कलम १६ (दहशतवादी कृत्यासाठी शिक्षा), कलम २० (दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याने शिक्षा), कलम ३९ (दहशतवादी संघटनेला समर्थन केल्याप्रकरणी शिक्षा) लागू होत नाही, असा युक्तिवाद स्वामी यांच्यातर्फे वकील शरीफ शेख यांनी केला.
स्वामी हे गेले दशकभर आदिवासी लोकांसाठी काम करत आहेत. सध्या ते तळोजा कारागृहात असून कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली. ते अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत.
...............................