अखेर सापडले खड्ड्यांतून पैसे मिळवणारे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 02:17 AM2019-11-05T02:17:04+5:302019-11-05T02:17:36+5:30
मुदतीनंतर भरले ८५ खड्डे : तक्रारदारांना पाचशे रुपयांचे बक्षीस
मुंबई : ‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेचे पहिले ८५ मानकरी अखेर सापडले आहेत. ही योजना सुरू केल्यापासून गेल्या चार दिवसांत ९० टक्के खड्डे दिलेल्या मुदतीपूर्वी भरल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु ८५ खड्डे डेडलाइननंतर भरण्यात आल्यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आपल्या खिशातून पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार या ८५ तक्रारदारांना ४२ हजार ५०० रुपये अदा करावे लागणार आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये खड्डा न बुजवल्यास पाचशे रुपयांचे बक्षीस देण्याची योजना १ नोव्हेंबरपासून महापालिकेने सुरू केली आहे. बक्षिसाची ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून देण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रार येताच खड्डा भरून घेण्याकरिता अधिकाºयांची पळापळ सुरू आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत २४ तासांच्या आतमध्ये खड्डे बुजवून घेण्यात अधिकारी यशस्वी ठरले.
परंतु खड्ड्यांच्या तक्रारींचा पालिकेच्या अॅपवर पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे तक्रारी आणि भरलेले खड्डे यामधील तफावत आता वाढू लागली आहे. संपूर्ण २४ विभागांमधून खड्ड्यांच्या १७८६ तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत ९०.३ टक्के खड्डे २४ तासांच्या आत भरण्यात आले आहेत. मात्र ८५ खड्डे २४ तास उलटल्यानंतर भरण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. सोमवारी ११८ तक्रारी आल्या असून २४ तासांच्या आत हे खड्डे भरण्यात येतील, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
म्हणूनच ही योजना...
पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने तब्बल ८० कोटी रुपयांची तरतूद केली होती. खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्राचा वापर केला. मात्र त्यानंतरही रस्त्यावर खड्डे कायम असल्याने पालिकेवर टीकेची झोड उठू लागली. त्यामुळे पालिका प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा योजना आणली.
च्खड्ड्यांची तक्रार ट८इेूढङ्म३ँङ्म’ीऋ्र७्र३ या अॅपवर करता येणार आहे. खड्डा एक फूट लांब आणि तीन इंच खोल असावा. तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
च्दाखवलेला खड्डा हा पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यावरचा असावा. तीन दिवसांमध्ये ८७९ खड्ड्यांच्या तक्ररींपैकी ७९४ खड्डे बुजविले आहेत.