Join us

कथ्थक क्षेत्रतील ‘सितारा’ निखळला

By admin | Published: November 26, 2014 1:37 AM

मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेलेल्या सितारादेवींना नृत्य सम्राज्ञी हे संबोधन त्या अवघ्या 16 वर्षाच्या असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बहाल केले होते.

लोकनृत्यातही पारंगत : भारतीय नृत्याला परदेशात प्रतिष्ठा मिळवून देणा:या नृत्यांगना
मुंबई : मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेलेल्या सितारादेवींना नृत्य सम्राज्ञी हे संबोधन त्या अवघ्या 16 वर्षाच्या असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बहाल केले होते. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्याशी झालेली पहिली भेट सितारा आणि तिचे पिता सुखदेव यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.त्या काळात कथ्थक नृत्याला प्रतिष्ठा नव्हती. खानदानी स्त्रिया कथ्थकपासून चार हात दूर होत्या. गुरुदेव टागोरांनी  कथ्थकला आध्यात्मिक जोड देण्याचे ह्या पिता-पुत्रीस सुचविले. तेथून एक नवा अध्याय सुरू झाला. कुटुंबाचं जगणं दुर्धर झालं, पण तरीही सुखदेव ह्यांचा लेकींना कथ्थक शिकवण्याचा निर्धार अटळ राहिला. अनेक हाल-अपेष्टांना तोंड देत ह्या कुटुंबाने कथ्थकची आराधना सुरूच ठेवली. सितारादेवी तेव्हां लहान होत्या,आपल्या मोठय़ा बहिणींना कथ्थक करताना तिने पाहिले, आणि कथ्थक हाच तिचा शेवटर्पयत ध्यास आणि श्वास राहिला..
कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म 192क् मध्ये कोलकाता येथे दीपावलीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव धनलक्ष्मी होते. शालेय जीवनापासूनच त्यांनी नृत्यनाटिकांतून काम केले. पुढे त्यांनी नृत्यातच प्राविण्य संपादन केले. नृत्यगुरू शंभू महाराज तसेच पं. बिरजू महाराज यांचे वडील अच्छन महाराज यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे धडे घेतले. 
वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी व्यावसायिक नृत्याच्या कार्यक्र मांना प्रारंभ केला. नृत्याच्या प्रेमापायी त्यांनी शालेय शिक्षणाला रामराम ठोकला आणि मुंबई गाठली. 
मुंबईच्या जहांगीर सभागृहात 
त्यांनी पहिला कार्यक्र म सादर करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सितारादेवी यांनी केवळ भारतातच नव्हे; तर परदेशातही कथ्थक नृत्य पोहोचवत या नृत्याला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. लंडन तसेच न्यूयॉर्क येथेही त्यांनी नृत्याचे कार्यक्र म सादर केले होते. 
सितारादेवी यांनी भरतनाटय़मचेही शिक्षण घेतले होते. विविध प्रकारच्या लोकनृत्यांतही त्या पारंगत होत्या. 
हिंदी चित्नपटसृष्टीत कथ्थक नृत्याला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे 
कार्य त्यांनी केले. मधुबाला, रेखा, मालासिन्हा आदी अभिनेत्नींना 
त्यांनी कथ्थकचे धडे दिले होते. हिंदी चित्नपटसृष्टीतील त्यांचे कार्य 
केवळ कथ्थक नृत्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. काही चित्नपटांत 
त्यांनी अभिनयही केला. नगीना, 
वतन, मेरी आंखे, होली, स्वामी, रोटी, चांद, हलचल, मदर इंडिया आदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. पद्मभूषण पुरस्कार मात्र त्यांनी नाकारला 
होता. त्यांची एकूण कारकीर्द 
लक्षात घेता भारतरत्न पुरस्कारावर नाव कोरले जावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. 
चित्रपटांमधील कारकीर्द
निरंजन शर्मा ह्या निर्मात्याने सिताराला नृत्यातील अफलातून कौशल्य पाहून  तिला काही चित्रपट दिले उषा हरण (194क्) नगिना (1951), रोटी, वतन (1954), अंजली (1957) मदर इंडिया (1957) अशा सिनेमांतून सितारादेवींनी फिल्मी डान्स सादर केले. मदर इंडिया हा त्यांचा अखेरचा सिनेमा.कथ्थककडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी सिनेमाला रामराम ठोकला.
अयशस्वी विवाह
मुगल-ए-आझमसारखा रुपेरी पडद्यावरच््या  सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक के असिफ ह्यांच्याशी सितारा देवींनी 
विवाह केला, तो अयशस्वी ठरला 
तेव्हां संगीतकार प्रताप बारोटशी 
दुसरा विवाह त्यांनी केला, पण तोही टिकला नाही. प्रताप बारोट यांच्याशी विवाहानंतर त्यांनी मुलाला जन्म 
दिला, जो नंतरच्या कालौघात रणजित बारोट नावाने प्रसिध्द संगीतकार बनला. असफल विवाहामुळे 
खिन्न न होता, पुन्हा आपलं सर्वस्व पणाला लावत ह्या विदुषीने 
स्वत:ला कथ्थकमध्ये झोकून दिलं. (प्रतिनिधी)
 
आजच्या युवा कथ्थक नर्तकांच्या दृष्टीने सितारादेवी हे खूप मोठे नाव होते. त्या एकमेव अशा नृत्यांगना होत्या, ज्यांचे नृत्य, आवाज, अभिनय तरु ण पिढीलाही लाजवणारा होता. कथ्थकला त्यांनी वेगळ्य़ा उंचीवर पोहोचवले. आज त्या आपल्यात नाहीत, हे कथ्थक क्षेत्रतील नवीन पिढीसाठी दु:खदायक आहे. 
- मयूर वैद्य, कथ्थक नर्तक
 
शेवटचे जाहीर दर्शन
मुंबईत  7-8 महिन्यांपूर्वी अभिनयसम्राट दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रचे प्रकाशन झाले त्या सोहळ्य़ास सितारादेवींची  व्हिल चेअरवर बसलेली उपस्थिती लक्षणीय होती. त्यांच्या डोळ्य़ांत आनंदाश्रू होते,लोकमत वार्ताहरास त्यांनी म्हटलं,युसुफ (दिलीप कुमार)मेरा मुंहबोला भाई है.त्याच्या आत्मचरित्रच्या प्रकाशनासाठी माङया मुलीने मला दिल्लीहून इथे आणले.आमच्यातली मैत्री मुगल-ए-आझम सिनेमापासून सुरू झाली..
 
कथ्थक-एक शैली-एक परंपरा 
सितारादेवींनी कथ्थकला एक दर्जा-एक शैली दिली, एके काळी हीन मानला जाणारा हा नृत्य प्रकार त्यांनी स्व:कर्तृत्वावर मोठा केला, त्यात कविता आणली, भारतीय आध्यात्माच्या पायावर त्यात अभिजातता निर्माण करण्याचे श्रेय त्यांचेच. कथ्थकमध्ये विलक्षण उर्जा निर्माण करण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं होतं. संपूर्ण रात्रभर त्या अखंड नाचत, तरीही त्यांच्यात सळसळती उर्जा कायम असे.
 
आठव्या वर्षी विवाह ठरला
च्वयाच्या आठव्या वर्षी सिताराचा विवाह ठरला, पण त्या वयात लग्नाला नकार देत सितारादेवींना नृत्यशाळेत केलेल्या  एका  नृत्य आविष्काराची दखल मोठय़ा प्रमाणावर घेतली गेली.आणि नृत्य करतांना सिता:यासारख्या चमकणा:या आपल्या लेकीचं धन्नो हे नाव बदलून सुखदेव यांनी सितारा हे सार्थ नाव दिलं. 
 
च्आतिया बेगम ह्यांच्या दरबारात दहा वर्षाच्या सिताराने केलेला नृत्याविष्कार इतका नेत्रदीपक होता की, ह्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या गुरू रविद्रंनाथ टागोरांनी छोटय़ा सिताराला शाल , श्रीफळ आणि पन्नास रुपये भेट दिले.पण, तिने त्यांच्याकडे फक्त आशीर्वाद मागितला.