पूजा सामंत - मुंबई
भोळ्या-भाबडय़ा जनतेने फिल्मी ग्लॅमरला भुलून आणि नरेंद्र मोदींच्या लाटेत वाहवत जात 2014च्या लोकसभा निवडणुकीत यंदाही फिल्मी दिग्गजांना भरघोस मताधिक्याने निवडून दिले खरे, पण ज्या फिल्मी स्टाईलमध्ये ह्या मंडळीनी आपला प्रचार-प्रसार केला होता, त्याच फिल्मी पद्धतीने हे फिल्मी धुरंधर आपापल्या मतदार क्षेत्रतून गायब झाले आहेत. जणू मतलब निकल गया हैं तो पेहचानते नहीं.! यापूर्वीदेखील फिल्मी सिता:यांनी आपल्या अशा प्रकारच्या वागणुकीची झलक दाखवून दिलेली आहे. धर्मेद्र ते विनोद खन्ना आणि गोविंदा ते राज बब्बर अशा सगळ्या स्टार्सनी राज्यसभा - लोकसभेत गेल्यानंतर आपल्या मतदारसंघातील जनतेची दखल घेतली नव्हती!
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालास एक महिना पूर्ण झालाय, पण निकालानंतर, विजयाच्या उन्मादानंतर फिल्मी सेलिब्रिटीज्नी आपल्या कार्यक्षेत्रत नेहमीच्या शिरस्त्याला धरून पाठ फिरवली आहे! भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या फिल्मी हस्तींमध्ये अभिनेत्री स्वप्नसुंदरी हेमा मालिनी, किरण खेर, अभिनेता विनोद खन्ना, परेश रावल, मनोज वाजपेई आणि गायक बाबुल सुप्रियो ह्यांचा समावेश आहे.
मथुरेतून निवडून आलेल्या हेमा मालिनीने फक्त एकदाच मथुरेत सरप्राईझ भेट दिल्याचे वृत्त आहे. पण बीजेपीची धुरा वाहणा:या ड्रीमगर्लने यमुना शुद्धीकरण ते विविध प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार अशी अनेक आश्वासने दिलेली आहेत. त्या आश्वासनांचे पुढे काय होणार अशी चिंता मथुरावासीयांना लागलेली आहे. हेमा मालिनी तिथे घर घेणार असल्याचे समजते, पण ते नजीकच्या काळात केंव्हा?
गुजरातमध्ये अभिनेता परेश रावलदेखील पूर्व अहमदाबादमधून निवडून आला, अनेक आश्वासनांची खैरात केली; पण त्यानंतर मात्र परेश भाई फिरकलेले नाहीत. परेश अनेक हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करतोय, त्यामुळे त्याने आपले सिनेमे पूर्ण करणो हे ओघाने आलेच! चंदिगढमधून निवडून आलेली किरण खेरदेखील मिरवणुकीच्या जल्लोषानंतर पुन्हा तेथे गेलीच नाही.
किरण खेरदेखील ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असतात, त्यामुळे पुढील सिझनसाठी खेरबाई पुन्हा एकदा तयार असतीलच!
अभिनेता विनोद खन्नाकडे सिनेमे नसतानादेखील तो गुरदासपूर (पंजाब)मध्ये फिरकलेला नाही, त्यामुळे तो गेल्या खेपेप्रमाणोच बेजबाबदार खासदाराची भूमिका पार पाडणार याची लक्षणो साफ दिसताहेत!
स्मृती इराणी, देशाच्या मानव संसाधन मंत्री यांनीदेखील उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘ऑल इज वेल’ सिनेमा अलीकडेच साइन केला असून, इराणीबाई ह्यात अभिषेक बच्चनची आई व ऋषी कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. हल्लीच हिमाचल प्रदेशात ह्या सिनेमाच्या शूटिंगचे एक सत्र पार पडले, ज्यात स्मृतीने भाग घेतला. खासदार आणि मंत्री बनलेले कलाकार फिल्मी कारकिर्दीला प्राध्यान्य देऊ लागले तर जनता संतापण्यास वेळ लागणार नाही!
हेमा मालिनी पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत
च्हेमा मालिनीला ‘शोले’मध्ये बसंतीची
अजरामर भूमिका देणारे दिग्दर्शक रमेश
सिप्पी यांनी अनेक वर्षाच्या कालावधीनंतर हेमाला पुन्हा एकदा आपल्या आगामी
सिनेमात एका मध्यवर्ती भूमिकेसाठी करारबद्ध केले असून, ते म्हणाले, माङया चित्रपटाचे शूटिंग दिवाळीनंतर सुरू होणार आहे.
च्हेमाजीच्या डेट्स मी आधीच घेतल्या आहेत. ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्स 2013च्या सुमारास घडल्या.
जनतेत संताप
च्खासदार आणि मंत्री बनलेले कलाकार फिल्मी कारकिर्दीला प्राध्यान्य देऊ लागले तर जनतेत रोष निर्माण होण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे त्यांनी वेळीच हे ओळखून आपल्या जबाबदा:या ओळखाव्यात हे उत्तम.