मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:30 PM2018-10-16T23:30:32+5:302018-10-16T23:30:47+5:30
मुंबई : मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. वाशी, ठाणे, कल्याण ...
Next
मुंबई : मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे.
वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरु केली आहे. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अचानकपणे ही तपासणी करत आहेत.