Join us

सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यातील वीजग्राहकांच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयातून ५०० रुपयांपेक्षा जास्त वीजबिलाची थकबाकी असणारे घरगुती, ...

मुंबई : राज्यातील वीजग्राहकांच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयातून ५०० रुपयांपेक्षा जास्त वीजबिलाची थकबाकी असणारे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कडक निर्देश सर्व परिमंडळांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुटीच्या दिवशी शनिवार व रविवारी भांडुप परिमंडळातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहतील.

भांडुप परिमंडळात वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. याशिवाय तात्पुरता खंडित केलेल्या वीजजोडणीची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनधिकृतपणे वीज वापरत असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. म्हणून ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा व नियमितपणे आपले वीजबिल भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना केले आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी भांडुप परिमंडळातील सर्व वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सुरू राहतील. ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर अथवा महावितरणच्या मोबाइल ॲपवरून वीजबिल भरू शकतात.