सिद्धिविनायक मंदिरातून हत्ती बचाव मोहिमेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:08 AM2017-08-14T06:08:11+5:302017-08-14T06:08:14+5:30

वाइल्डलाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या वतीने सिद्धिविनायक मंदिरात देशातील जंगली हत्तींना बचाव उपक्रमांतर्गत ‘गजयात्रा’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Start of elephant rescue campaign from Siddhivinayak Temple | सिद्धिविनायक मंदिरातून हत्ती बचाव मोहिमेला प्रारंभ

सिद्धिविनायक मंदिरातून हत्ती बचाव मोहिमेला प्रारंभ

Next

मुंबई : वाइल्डलाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या वतीने सिद्धिविनायक मंदिरात देशातील जंगली हत्तींना बचाव उपक्रमांतर्गत ‘गजयात्रा’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रभादेवी येथे रविवारी झालेल्या विशेष कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, डब्ल्यूटीआयचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मेनन, अभिनेत्री दिया मिर्झा यांची उपस्थिती होती.
जंगली हत्तींसाठी असलेली संकुचित जागा आणि हत्ती क्षेत्रांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. देशात सुमारे ३० हजार जंगली आशियाई हत्ती असून ही संख्या जगातील एकूण प्रजातीच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.
या वेळी अध्यक्षीय भाषणात सुरेश प्रभू यांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे
आवाहन केले. तर दिया मिर्झा म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीमध्ये चॅम्पियन आॅफ नेचर बनण्याची क्षमता आहे. गजयात्रा यशस्वी होण्यासाठी लोकांचे सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Start of elephant rescue campaign from Siddhivinayak Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.