एलिफंटा महोत्सवाला प्रारंभ
By admin | Published: February 17, 2016 02:31 AM2016-02-17T02:31:53+5:302016-02-17T02:31:53+5:30
कला आणि संगीताचा मिलाफ असलेल्या ‘एलिफंटा महोत्सवा’ला मंगळवारी सुरुवात झाली. गेट वे आॅफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात गायक कैलास खेर
मुंबई : कला आणि संगीताचा मिलाफ असलेल्या ‘एलिफंटा महोत्सवा’ला मंगळवारी सुरुवात झाली. गेट वे आॅफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात गायक कैलास खेर यांच्या आवाजाने भारावून जात मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्यासोबत गाणे गुणगुणले.
कैलास खेर यांनी उत्तमोत्तम गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इतकेच नाही, तर या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक कैलास खेर यांच्याकडे ‘तेरी दिवानी’ या गाण्याची फर्माइश केली. केवळ इतकेच नव्हेतर, खेर यांच्यासोबत गाणे गाण्यास साथही दिली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मनमुराद दाद दिली.
पंडित विश्वमोहन भट यांनी मोहनवीणा वाद्याचे सादरीकरण केले. त्यांच्या देशभक्तीपर गाण्यांना उपस्थितांनी दाद दिली. तसेच महाराष्ट्राच्या मराठमोळ्या
संस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
एलिफंटासोबत महाराष्ट्राला लाभलेल्या अन्य पर्यटनस्थळांची माहिती देणारी महाराष्ट्र पर्यटनाची चित्रफीत दाखवण्यात आली. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार असून, त्या वेळी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. (प्रतिनिधी)