वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अग्निशमन केंद्र लवकर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:05 AM2021-02-12T04:05:47+5:302021-02-12T04:05:47+5:30
मनोहर कुंभेजकर मुंबई : वर्सोवा भागात वारंवार आगीच्या घटना घडत आहे. यारी रोड, मंगल नगर परिसरातील नागरी वस्तीतील गॅसच्या ...
मनोहर कुंभेजकर
मुंबई : वर्सोवा भागात वारंवार आगीच्या घटना घडत आहे. यारी रोड, मंगल नगर परिसरातील नागरी वस्तीतील गॅसच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचे स्फोट होऊन येथील परिसर हादरून गेला होता. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या १६ गाड्यांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तरी आग लवकर आटोक्यात आली नाही. त्याआधी वेसावे, तेरे गल्लीत अशीच आग लागली होती. तर पाच सहा दिवसांपूर्वी लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटला आग लागली होती. अशा आगीच्या घटना येथे आता वारंवार घडत आहेत. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात अग्निशमन केंद्र लवकर सुरू करा, अशी मागणी वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.