Join us

मुंबई शहरात व उपनगरात गरम, ताजा आहार लवकरात लवकर सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेली वर्षभर कोरोनाच्या महामारीमुळे महिला संस्था, महिला मंडळे तसेच स्वयं संस्था, बचत गट यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेली वर्षभर कोरोनाच्या महामारीमुळे महिला संस्था, महिला मंडळे तसेच स्वयं संस्था, बचत गट यांचे काम अचानक बंद झाले आहे. परिणामी मुंबई शहरात तसेच उपनगरात गरम ताजा आहार लवकरात लवकर सुरू करावा आणि महिला संस्था, महिला मंडळे, महिला बचत गट यांना आहार पुरवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जयश्री पांचाळ यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तळागाळातील महिलांचे काम परत सुरू करावे, यासाठी एक समिती नेमावी, असे सुचवले गेले आहे. आजतागायत दीड ते दोन वर्ष काम सुरू आहे. मात्र, याबाबत ठोस असे निर्णय झाले नाहीत. तसेच पात्र संस्थांना काही ठिकाणी ऑर्डर देण्यात आली. परंतु सुरू करण्याची ऑर्डर दिली गेली नाही. जयश्री पांचाळ म्हणाल्या की, महिला संस्थाना कोणतेही काम नसल्यामुळे तसेच शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सर्व महिला या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. आपण वेळीच काम सुरू केले नाही तर ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या करत आहेत, तर शहरात महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत, हे चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.