Join us

सागरी मार्गाचा पावसाळ्यापूर्वी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:46 AM

मॅग्नेटिक महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही परदेशी गुंतवणूकदार, तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला सागरी मार्ग लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे.

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही परदेशी गुंतवणूकदार, तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला सागरी मार्ग लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय अशा सतरा कंपन्यांनीही या प्रकल्पात स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे महापालिकेला आता केंद्र सरकारकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत घेण्यात आलेल्या सतरा विविध परवानगींमध्ये ही अंतिम असणार आहे. यानंतर सल्लागार नियुक्त करून या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा बार उडविण्यात येणार आहे.गिरगाव चौपाटीला या प्रकल्पाचा धक्का बसेल म्हणून मुंबई पुरातन वस्तू समितीने आक्षेप घेतला होता. तर सागरी मार्गात तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने पर्यावरण खात्याची परवानगी मिळवणे पालिकेसाठी आव्हानात्मक ठरले. असे सर्व सरकारी अडथळे पार करीत हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशा प्रकारच्या या पहिल्या प्रकल्पासाठी सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेनंतर सतरा ठेकेदार पात्र ठरले आहेत. अंदाजे आठ हजार कोटींच्या या प्रकल्पाचे काम सर्वात कमी बोली लावणाºया कंपनीला मिळणार आहे.मात्र या सतरा कंपन्यांमध्ये चीन, इटली, कोरिया, गल्फ अशा देशांतील कंपन्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या कंपन्यांना संधी देण्याआधी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक ठरते.केंद्रीय गृह मंत्रालयाने बाद केलेल्या परदेशी कंपनीचे निविदा पत्र उघडण्यात येणार नाही. ज्यामुळे ती निविदा आपोआपचं बाद ठरणार आहे. आतापर्यंत वन विभाग, पर्यावरण, मेरी टाइम बोर्ड अशा केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या परवानगी पालिकेने मिळवली आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते कांदिवली या सागरी मार्गाचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.यासाठी घ्यावी लागेल परवानगीगेल्या वर्षी मुंबई ट्रन्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी अर्ज करणाºया गायत्री प्रोजेक्ट लि. या कंपनीची चीनच्या चायना रेल्वे मेजर ब्रिज इंजिनिअरिंग ग्रुप लि. या कंपनीबरोबर भागिदारी असल्याने केंद्राने परवानगी नाकारली होती. वांद्रे वरळी सागरी सेतूबरोबरच अन्य प्रकल्प चीन व भारतामध्ये असलेल्या कामामुळे यापूवीर्ही चीनच्या कंपन्यांचे प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारले आहेत.वाहतूक कोंडी फुटणारया प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपटी येथून निघालेला हा बोगदा थेट प्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होणार नाही. तिथून हा प्रकल्प वांद्रे सागरी सेतू ते गोराई असा प्रवास करेल. या प्रकल्पासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातून उपनगरात जाण्यास दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा होणार आहे.

टॅग्स :मॅग्नेटिक महाराष्ट्र