Join us

संमेलनाच्या पूर्वतयारीला आजपासून प्रारंभ

By admin | Published: January 25, 2017 4:42 AM

डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे बुधवार, २५ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

कल्याण : डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे बुधवार, २५ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकही सहभागी होणार आहेत. केडीएमसीच्या डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्यक, मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी २८ नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वपक्षीय गटनेते व घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता संमेलनाच्या पूर्वी आणि संमेलन कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी (२६ जानेवारी गणराज्य दिन वगळता) दरम्यान राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.स्वच्छता मोहिमेत कल्याण शहरातील दुर्गामाता चौक ते पत्रीपूल, पत्रीपूल ते सोनारपाडा गाव, पुणे लिंक रोड, सूचक नाका ते श्रीराम टॉकिज हा रस्ता साफ केला जाणार आहे. डोंबिवली शहरातील मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक ते गांधीनगर, गांधीनगर ते शिळ रोड, कल्याण शिळ रोड ते सोनारपाडा निळजे गावापर्यंत, घारडा सर्कल ते कल्याण शिळ रोड, घारडा सर्कल ते बंदिश हॉटेल, टाटा पॉवर लाइन, मानपाडा रोड, टिळक पुतळा, डोंबिवली पूर्व स्टेशन ते गणपती मंदिर, फडके रोड, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, डोंबिवली पश्चिम येथील जोंधळे हायस्कूल ते भावे सभागृह, दिनदयाळ रोड ते सम्राट चौक हा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. रस्त्यांची डागडुजी होणारस्वच्छता मोहिमेव्यतिरिक्त रस्त्यांवरील दुभाजक, चौक आतील रस्ते, मार्केट परिसर, स्वच्छ ठेवण्याकरीता कार्यकारी अभियंता, प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रस्ते दुरु स्ती, रस्त्यांची डागडुजी, दिशादर्शक फलक, सार्वजनिक शौचालय साफसफाई, गटारे दुरु स्ती व त्यावरील झाकणे लावणे, विद्युत खांब, सिग्नल यंत्रणा अद्यावत करणे, अशा प्रकारची कामे अभियंत्यांना सोपविली आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्याकरीता महापालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या कामांचा महापौर देवळेकर , सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे हे संमेलनापर्यंत व्यक्तीश: आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)