Join us

बिरवाडीमध्ये करवसुली अभियानास सुरुवात

By admin | Published: December 03, 2014 11:04 PM

महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रा.पं. मार्फत थकीत करवसुलीकरिता भव्य करवसुली अभियान राबविले जात

बिरवाडी : महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रा.पं. मार्फत थकीत करवसुलीकरिता भव्य करवसुली अभियान राबविले जात असून यामध्ये कराच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करणार असल्याची माहिती बिरवाडी ग्रा. पं. सरपंच लक्ष्मण पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता शासनामार्फत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीमध्ये करवसुली अभियान राबविण्यात येत असून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करवसुली भरणा न करणाऱ्या खातेदारांची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या अभियानामुळे थकीत रकमेचा भरणा होणार असला तरी देखील आजपर्यंत ५० ते ५५ टक्के करवसुली झाली असल्याची माहिती सरपंच पवार यांनी दिली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्यात मोठ्या करदात्यांकडून टाळाटाळ होत असल्यानेच त्याचा फटका बिरवाडीच्या विकासाला बसत असल्यानेच नियमानुसार धडक कारवाई करण्याची मोहीम बिरवाडी ग्रा. पं. ने हाती घेतली असल्याचे पवार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत थकीत कराची रक्कम ग्रा. पं. कडे भरणा न करणाऱ्या खातेदारांची मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त केली जाईल, त्यानुसार त्यांची नावे देखील जाहीर केली जातील असा इशारा पवार यांनी याप्रसंगी दिला आहे. (वार्ताहर)