पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉक ईन पद्धत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:49 PM2021-05-24T17:49:35+5:302021-05-24T17:50:18+5:30

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

Start a walk-in vaccination over the age of 45 who take the first dose in mumbai, demand by Shiv sena | पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉक ईन पद्धत सुरू करा

पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉक ईन पद्धत सुरू करा

googlenewsNext

मुंबई-मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईच्या 227 वॉर्ड मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या कालच्या सुधारित लसीकरण परिपत्रकात
त्रुटी असून फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे अशी कैफियत शिवसेना प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेना शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी
सुधारित सूचनेद्वारे 60 वर्षे व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे व दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी आणि 45 वर्षे वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे लाभार्थीना  दि,24 ते 26 मे  तीन दिवस वॉक ईन मुभा असणार आहे. मात्र सदर योजनेमध्ये
45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थीचा समावेश नाही. त्यामुळे फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये पालिकेच्या पैश्याच्या आणि मनुष्यबाळाचा विनीयोग होत आहे असे शीतल म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले.

त्यामुळे नागरिकांचे लसीकरण लवकर होण्यासाठी 45 वर्षांवरील पहिल्या डोसची मात्रा घेणाऱ्या नागरिकांसाठी
वॉक ईन लसीकरण पद्धत सुरू करा अशी आग्रही मागणी शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

Web Title: Start a walk-in vaccination over the age of 45 who take the first dose in mumbai, demand by Shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.