राममंदिर उभारण्यास वर्षअखेरपर्यंत प्रारंभ

By admin | Published: April 18, 2016 01:59 AM2016-04-18T01:59:03+5:302016-04-18T01:59:03+5:30

सहा दशकांहून अधिक काळ राममंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाने मंदिर उभारणीचा

Start by year end to build Ram temple | राममंदिर उभारण्यास वर्षअखेरपर्यंत प्रारंभ

राममंदिर उभारण्यास वर्षअखेरपर्यंत प्रारंभ

Next

मुंबई : सहा दशकांहून अधिक काळ राममंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होणार असून, वर्षाअखेरीपर्यंत प्रत्यक्ष मंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ होईल, असे भाकीत भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी केले.
अयोध्येत राममंदिर का आणि कसे, या विषयावर मुंबईत आयोजित कार्यक्रमात स्वामी बोलत होते. सध्या सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद-रामजन्मभूमी खटला चालू आहे. दैनंदिन तत्त्वावर सुनावणी सुरू असून मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी दोन्ही बाजूंची सहमती घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खटल्याशी संबंधित मुस्लीम नेत्यांशी सातत्याने बोलणी चालू आहेत. काही प्रस्तावांना त्यांनी तत्त्वत: मान्यताही दिली होती. मात्र न्यायालयात या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची वेळ आली तेव्हा या नेत्यांनी माघार घेतल्याचा दावा स्वामी यांनी भाषणादरम्यान केला.
सातत्याने नेहरू-गांधी घराण्याला टीकेचे लक्ष्य करणारे स्वामी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींवर स्तुतीसुमने उधळली. अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी राजीव गांधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले असते तर त्यांच्या कार्यकाळात रामजन्मभूमीवर नक्कीच मंदिर उभारले गेले असते, असे स्वामी म्हणाले. राजीव गांधी यांनीच अयोध्येतील वादग्रस्त जागेवर असणाऱ्या राममंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिलान्यासाचा कार्यक्रम होऊ शकला. राजीव गांधींचा आणि माझा जवळून परिचय होता. रामराज्याची संकल्पना त्यांनी उचलून धरली होती. परंतु त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मंदिर निर्माणाला खीळ बसली आणि पुढे सर्वच संदर्भ बदलल्याचे ते म्हणाले.
स्वामी यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. देशाला शाळा, रुग्णालये, रस्ते आणि प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे की राममंदिराची, असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला. यावर स्वामी म्हणाले की, शाळा, रुग्णालयांसारखी विकासकामे सरकारची जबाबदारी आहे आणि ते योग्य पद्धतीने पार पाडत आहे, तर मंदिर उभारणीचे माझे काम मी करीत आहे.

शाळा, रुग्णालये हवी की राम मंदिर?
देशाला शाळा, रुग्णालये, रस्ते आणि प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे की राममंदिराची, असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला. यावर स्वामी म्हणाले की, शाळा रुग्णालयांसारखी विकासकामे सरकारची जबाबदारी आहे आणि ते योग्य पद्धतीने पार पाडत आहे, तर मंदिर उभारणीचे माझे काम मी करीत आहे़
राजीव गांधी यांनीच अयोध्येतील वादग्रस्त जागेवर असणाऱ्या राममंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिलान्यासाचा कार्यक्रम होऊ शकला. राजीव गांधींचा आणि माझा जवळून परिचय होता. रामराज्याची संकल्पना त्यांनी उचलून धरली होती.

Web Title: Start by year end to build Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.