Join us  

फेरीवाला नोंदणीस सुरवात

By admin | Published: June 19, 2014 10:31 PM

ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले असून अखेर अर्जांची विक्री करण्यास पालिकेने सुरु केली आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरण निश्चित केले असून अखेर अर्जांची विक्री करण्यास पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार चार दिवसात सुमारे दोन हजार फेरीवाल्यांनी अर्ज घेतले आहेत. या धोरणाला फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. फेरीवाला धोरणानुसार आता नऊ प्रभाग समिती अंतर्गत फेरीवाल्यांचा सर्व्हे केला जाणार असून ज्या पध्दतीने आधार कार्ड नागरीकांना दिले जात आहे. त्याच धर्तीवर फेरीवाल्यांना फेरीवाला कार्ड दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ जून पासून या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरु वात करण्यात आली असून अर्ज वितरण करण्यात येत आहेत. त्यातच चार दिवसात ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत अर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी दिली.दरम्यान, प्रभाग समिती निहाय कमिटी तयार केल्या जाणार असून त्यानंतर फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीवरु न शहरात कीती फेरीवाले आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच तो फेरीवाला कुठे बसतो, त्याच्या कामाचे स्वरु प काय? याची माहिती फॉर्मवर भरु न घेतली जाणार आहे. त्यानंतर फेरीवाल्यांचे आरक्षण टाकले जाणार आहेत. त्यातच आधारकार्डच्या धर्तीवर फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच ही नोंदणी केल्यानंतर त्यांना टप्याटप्याने फेरीवाला कार्ड दिले जाणार असल्याची माहिती अतिक्र मण विभागाचे उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी दिली.