मुंबई : इंडोनेशियामधील बाली येथे जाण्यासाठी मुंबईहून थेट विमानसेवा सोमवारपासून सुरू होत आहे. सोमवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा सुरू राहील. गरुडा इंडोनेशिया विमानसेवेच्या ए-३३० प्रकारातील विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. या विमानाची आसन क्षमता २२२ प्रवासी इतकी आहे. हे विमान रात्री ८.२५ ला मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येईल व ९.५० ला बालीसाठी रवाना होईल. सोमवारी होणाऱ्या पहिल्या उड्डाणासाठी गरुडा इंडोनेशियाचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार आहेत. बाली हे पर्यटनस्थळ असल्याने तेथे जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याचा लाभ मुंबईसह देशातील पर्यटकांना मिळेल.
मुंबई ते बाली थेट विमानसेवेला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:25 AM