मुंबई : मुंबईत अनलॉक करण्यात आले तरी निर्बंधांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सूट मिळाली नाही. त्यामुळे मुंबई विभागात एसटी महामंडळाकडून रातराणी व रात्री सोडण्यात येणाऱ्या फेऱ्यापैकी दोन गाड्या सुरू आहेत.
दैनंदिन फेऱ्यांची संख्या वाढली असून, शिवशाही बसही रस्त्यांवर उतरल्या आहेत; मात्र या बससोबत खासगी बसलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. निर्बंधांमध्ये सूट मिळाल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूकही पूर्ववत होत आहे. १ जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही शहरातील फेऱ्या शेड्यूल करण्यात आल्या आहेत. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढत आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद फेऱ्या सुरू झाल्या आहेत. शनिवार व रविवार प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात असतो. उर्वरित दिवसाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळासोबत खासगी बसच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश खासगी बसमालकांनी बससेवा बंद ठेवली आहे. प्रवासी नसल्याने बस चालविणे अवघड होऊन बसले आहे. निर्बंध शिथिल झाले आहेत; परंतु एसटी बससोबत खासगी बसलाही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश खासगी बस अजूनही उभ्या आहेत. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.
खासगी बसचे तिकीट जास्त असते. तरी बहुतांश प्रवासी लांबच्या प्रवासाला या बसला प्राधान्य देतात. शहरातून पुणे, मुंबई, नागपूर या लांबच्या प्रवासासाठी खासगी बस ये-जा करतात.
दोन मार्गावर गाडी सुरू
एसटी महामंडळाने परळ ते कराड आणि पनवेल ते धुळे मार्गावर बसचे शेड्यूल केले आहे; मात्र त्यालाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.
एसटीच्या रातराणीमध्ये स्लीपरचे प्रमाण कमी आहे तसेच भाडे जास्त, गाड्यांची संख्या कमी आहे त्या तुलनेत खासगी बस जास्त आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी गाड्यांना प्राधान्य देतात असे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या दोन ते पाच टक्के ट्रॅव्हल्स सुरू
कोरोनामुळे बहुतांश खासगी बस मालकांनी बससेवा बंद ठेवली आहे. गेल्यावर्षी १० हजार बस सुरू होत्या यंदा तो आकडा तीन हजारांवर आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगळे नियम आहेत त्यामुळे अडचणी येत आहेत. सध्या दोन ते पाच टक्के ट्रॅव्हल्स सुरू आहेत.तसेच प्रवासी क्षमता १०० टक्के सांगण्यात येते मात्र ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी असेल तर दंड आकारला जातो.
हर्ष कोटक ,सचिव, बस मालक संघटना
मुंबई विभागातून एसटीच्या रातराणीच्या फेऱ्या सुरू आहेत?
२