पासपोर्ट देण्यास सुरुवात
By admin | Published: June 5, 2016 01:16 AM2016-06-05T01:16:51+5:302016-06-05T01:16:51+5:30
कुलाब्याच्या मेट्रो हाउसला लागलेल्या आगीत परदेशी पर्यटकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. गुरुवारी लागलेल्या आगीत काही विदेशी पर्यटकांचे पासपोर्ट जळून खाक झाले, तर काही
मुंबई : कुलाब्याच्या मेट्रो हाउसला लागलेल्या आगीत परदेशी पर्यटकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. गुरुवारी लागलेल्या आगीत काही विदेशी पर्यटकांचे पासपोर्ट जळून खाक झाले, तर काही पर्यटकांचे पासपोर्ट पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले. शनिवारी सकाळपासून पर्यटकांनी पोलीस ठाण्यात पासपोर्ट, तसेच अन्य वस्तूंसाठी धाव घेतली. यातील तीन पर्यटकांचे पासपोर्ट परत देण्यात आले.
आग विझवण्याचे काम सुरू असताना अग्निशमन दल व कुलाबा पोलिसांनी मेट्रो हाउसमध्ये वास्तव्यास असलल्या पाच ते सहा परदेशी पर्यटकांचे पासपोर्ट व अन्य वस्तू सुखरूपपणे बाहेर काढल्या होत्या. त्यातले बहुतांश पर्यटक हे येत्या दोनेक दिवसांत आपल्या देशी परतण्याच्या तयारीत होते. शनिवारी यातील तिघांचे पासपोर्ट देण्यात आल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक विनय गाडगीळ यांनी दिली.
पोलीस प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांच्या माहितीनुसार आगीची नोंद घेण्यात आली आहे. मेट्रो हाउसमधील दुकाने, लॉजमालक, त्यात राहणारे देशी-विदेशी पर्यटक आणि अन्य जणांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)