ठाणे ते आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेला प्रारंभ
By admin | Published: July 3, 2014 08:11 PM2014-07-03T20:11:41+5:302014-07-04T00:12:39+5:30
बेस्टची आणखी एक वातानुकूलित सेवा
* बेस्टची आणखी एक वातानुकूलित सेवा
ठाणे- शहरातून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या प्रवाशांसाठी कॅडबरी जंक्शन ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी थेट बेस्टची बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचा प्रारंभ मंगळवारी सायंकाळी करण्यात आला.
ठाण्यातून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या विमानतळाकडे जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. ते सार्वजनिक उपक्रमाच्या बसेसच्या तुलनेत खर्चीकही होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी प्रवाशांच्या मागणीचा बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ठाणे ते विमानतळ (टी-२) ही वातानुकूलित बससेवा बेस्टने सुरू केली आहे. या बससेवेचा शुभारंभ विचारे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, आमदार प्रताप सरनाईक, भास्कर पाटील, नगरसेवक हिराकांत फर्डे, नगरसेविका नंदिनी विचारे, मंदार विचारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
.......................