एमएचटी-सीईटीचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:29 AM2020-01-10T04:29:58+5:302020-01-10T04:30:02+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी-सीईटी २०२० प्रवेश परीक्षेला ऑनलाइन अर्ज करण्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमएचटी-सीईटी २०२० प्रवेश परीक्षेला ऑनलाइन अर्ज करण्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार एमबीए आणि एमएमएस परीक्षेसाठी विद्यार्थी उमेदवारांनी १० जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२० च्या दरम्यान अर्ज दाखल करायचे आहेत. तर एमसीएसाठी आॅनलाइन परीक्षेसाठी १५ जानेवारी ते २२ फेब्रुवारीच्या दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना करायची असल्याचे सीईटी सेलद्वारे कळविण्यात आले आहे.
परीक्षा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या जात प्रमाणपत्रासाठीची, नॉन क्रिमीलेअर आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करावी, असे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे. मागील वर्षी निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या वेळी धावपळ दिसून आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधीपासूनच तयारी करावी, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी पालक विद्यार्थ्यांना केले आहे.