आयआयटी बॉम्बेमध्ये मिळणार स्टार्टअप मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 02:54 AM2020-01-24T02:54:13+5:302020-01-24T02:54:39+5:30

शिक्षण पूर्ण झाले, की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वत:चा स्टार्टअप सुरू करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी नेमका कोणता मार्ग निवडावा याची माहिती नसते.

Startup Guide to Get IIT Bombay | आयआयटी बॉम्बेमध्ये मिळणार स्टार्टअप मार्गदर्शन

आयआयटी बॉम्बेमध्ये मिळणार स्टार्टअप मार्गदर्शन

Next

मुंबई : शिक्षण पूर्ण झाले, की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वत:चा स्टार्टअप सुरू करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी नेमका कोणता मार्ग निवडावा याची माहिती नसते. अशाच तरुणांसाठी उपयुक्त ठरेल असे आयआयटी बॉम्बेचे यंदाचे ई-समिट यंदा फेब्रुवारी १ आणि २ या दिवशी होत असून, लोकमत त्याचा मीडिया पार्टनर आहे. स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम यात होणार असल्याने तरुणाईसाठी दिशादर्शक असणाºया या कार्यक्रमाचे हे १५वे वर्ष असणार आहे.

मागील वर्षी उबेरचे सीईओ ट्रेव्हिक कलानिक्स, एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, निरंजन हिरानंदानी, नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष मायकल स्पिजल्मन, इंडिया टीव्हीचे अध्यक्ष रजत शर्मा अशा दिग्गजांनी ई समिटला उपस्थिती दर्शविली होती. यंदाही उद्योग जगतातील दिग्गजांची उपस्थिती कायम राहणार आहे. विप्रो चेअरमन रशीद प्रेमजी, फिल्ममेकर आणि प्रोड्युसर अनुराग कश्यप, टिष्ट्वटरचे भारत विभागप्रमुख मनीष महेश्वरी, लिनोवोचे सीईओ राहुल अग्रवाल हे दिग्गज दोन दिवसांच्या या कार्यक्रमांत तरुणाईला मार्गदर्शन करणार आहेत.
दोन दिवसांच्या ई-समिट कार्यक्रमात रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इनोव्हेशन कॉन्क्लेव, स्टार्ट अप एक्स्पो, टेन मिनीट मिलियन चॅलेंज, सीड स्टार्स, इन्टर्नशिप्स अँड जॉब फेअर्स, वर्कशॉप्स, हॅकेथॉन्स या उपक्रमांचा समावेश असणार आहे. या प्रत्येक उपक्रमाचे स्वत:चे एक वैशिष्ट्य असून तरुणाईला स्वत:चा उद्योग, स्टार्ट अप, बिझनेस सुरू करण्यासाठी अमूल्य मार्गदर्शन यांमधून मिळणार असल्याने या समिटला येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Startup Guide to Get IIT Bombay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.