दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातही ‘स्टार्टअप्स’ - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 09:03 PM2019-01-02T21:03:25+5:302019-01-02T21:03:46+5:30

महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिन; महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

'Startups' in security sector to prevent terrorism - Chief Minister | दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातही ‘स्टार्टअप्स’ - मुख्यमंत्री

दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातही ‘स्टार्टअप्स’ - मुख्यमंत्री

Next

मुंबई - तंत्रज्ञानावर आधारित या लढायांना पराभूत करण्यासाठी, सकारात्मक अशा घटकांची मोट बांधण्याची गरज आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणाऱ्या सुरक्षा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारे धोरण आखले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पोलीस महासंचालनालयाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलिस महासंचालक पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांच्यासह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी आलोक जोशी, इन्स्टिट्यूट आॅफ कॉफ्लिक्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजय सहानी यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘ महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील क्रमांक एकचे पोलीस दल आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील असलेल्या शहरांची सुरक्षा सक्षमपणे हाताळली आहे. यापुढे सायबर स्पेस आणि समाज माध्यमांतूनच दहशतवादी कारवायांना उत्तेजन देणाºया तंत्रज्ञानावर आधारीत लढाया लढल्या जातील. त्यांना प्रतिबंधासाठी तितक्याच चांगल्या आणि सकारात्मक संकल्पनांनी वेगवेगळ्या प्रणालींवर काम करावे लागेल. अशा घटकांना जोडून घ्यावे लागेल. त्यासाठी संस्थात्मक अशी संरचनाही निर्माण करावी लागेल. याचसाठी आपण आता प्रयत्नशील आहोत. अलिकडेच मुंबई पोलिसांनी आर्टिफिशीयल इंटलेजीन्सवर आधारित प्रणाली वापरणे सुरु केले आहे. अन्य व्यावसायिक क्षेत्रातही नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स सुरु झाली आहेत. अशा स्टार्टअप्सनांना सुरक्षेच्या क्षेत्रातही संशोधनातून नाविन्यपूर्ण प्रणाली निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
जोशी म्हणाले, ‘दहशतवादी आणि नक्षलवादी कारवायांना हाणून पाडण्यासाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा प्रभावी वापर करावा लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील बिग डाटा अ‍ॅनालिटीक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या प्रणालीच्या वापराबाबत अधिक सक्षमता आणावी लागेल. वित्तीय संरचनावरील आणि सायबर हल्ल्यांसह आता जैविक हल्ल्यांचाही विचार करावा लागेल. तपासयंत्रणाची संपर्क आणि समन्वय यातील संवेदनशीलता जपण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आता जीओ फेन्सिंग सारख्या संकल्पनांचाही अवलंब करता येईल.
डॉ. सहानी यांनी दहशतवादासाठी समाज माध्यमांच्या वाढत्या वापराबाबत तपशीलवार मांडणी केली. ते म्हणाले, समाज माध्यमांचा दहशतवादी कारवायांसाठीचा वापर रोखणे ही जगभरातल्या अनेक राष्ट्रांची समस्या आहे. मुलतत्त्ववादी विचारांच्या प्रसारांसाठी समाज माध्यमांचा बेमालूमपणे वापर करणे सुरु झाले आहे. हा वापर रोखण्यासाठी संबंधित कंपन्यांवरही मोठा दबाव आहे. त्या कंपन्यांही प्रयत्नशील आहेत. पण विध्वसंक वृत्ती मोठ्या शिताफीने या जालकाचा लक्ष्य गटापर्यंत पोहचण्यासाठी, गैर-सहानुभूती मिळविण्यासाठी अनेकस्तरांवरून प्रयत्न करत असतात. त्यामुळेच या कारवायांना रोखण्यासाठी राष्ट्रीय धोरण आणि तसेच संवैधानिक रचना आणणे आवश्यक आहे.

Web Title: 'Startups' in security sector to prevent terrorism - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.