Join us

परदेशात शिक्षणाला गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 6:57 PM

सरकारने तातडीने याकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करावी ही मागणी देखील विजय वडेट्टीवर यांनी सरकारकडे केली आहे.

मुंबई: सरकारने शिष्यवृत्ती अडवल्याने परदेशात शिक्षणाला गेलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांवर बेघर होवून उपाशी राहण्याची वेळ आली असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले की, महाज्योती मार्फत परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या भरवशावर ५० ओबीसी विद्यार्थी जे परदेशी शिक्षणासाठी गेले आहे त्यांच्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची माहिती पुढे आली आहे.परदेशी जाण्यासाठी विमानाचे भाडे, तेथील वसतिगृहाचे भाडे, कॉलेजचे शुल्क, विमा खर्च व दैनंदिन प्रवासाचा खर्च व जेवणाचा खर्च हा विद्यार्थ्यांना स्वतः करावा लागतोय, असं विजय वडेट्टीवर म्हणाले.

विद्यार्थ्यांकडील स्वतःचे पैसे संपत आले असून अजून पर्यंत सरकारने जाहीर केलेली शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी गेलेले ओबीसी विद्यार्थी आर्थिक कोंडीत सापडले आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष घालून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करावी ही मागणी देखील विजय वडेट्टीवर यांनी सरकारकडे केली आहे.

टॅग्स :विजय वडेट्टीवारमहाराष्ट्र सरकार