लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६ हजार ३६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३.४२ टक्के झाला असून मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या राज्यात ७३,३७४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात मंगळवारी काेराेनाच्या ४ हजार २६ रुग्णांचे निदान झाले असून ५३ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या एकूण संख्या १८ लाख ५९ हजार ३६७ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार ८२७ झाला आहे. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
.......................