राज्यात २ हजार ९४० कोरोना संसर्गाने बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:27 AM2020-04-16T06:27:37+5:302020-04-16T06:28:17+5:30

गेल्या २४ तासांत २३२ नवे रुग्ण, २९५ कोरोनामुक्त; मुंबईत १८९६ बाधित; एकूण ११४ मृत्यू

The state is affected by 6,990 corona infections | राज्यात २ हजार ९४० कोरोना संसर्गाने बाधित

राज्यात २ हजार ९४० कोरोना संसर्गाने बाधित

Next

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या २९४० झाली आहे. दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बुधवारी राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०३ झाली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १८९६ झाली असून मृतांचा आकडा ११४ वर पोहोचला आहे.

५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाइन असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. या ९ मृतांपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत. ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांंपैकी ६ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग आदी आजार
आढळले.

३४३ जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही
नवी दिल्ली : देशातील ७२० पैकी ३४३ जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोना विषाणूंचा प्रवेश झालेला नाही, ही दिलासादायक बातमी असली तरी ३७७ जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आहेत, हे बुधवारी स्पष्ट झाले. यातील १७० जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांना हॉट स्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ३७० असून, त्यातील ४२२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या १,५०८ असून, सध्या १० हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना विषाणूंचा अद्याप कुठेही सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने पुन्हा केला. काही भागांत वा वस्त्यांत कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले असले तरी त्यास सामुदायिक संसर्ग म्हणता येणार नाही, असे सांगण्यात आले.

26,000
मृत्यू अमेरिकेत
जगातील कोरोनाचे एकूण २० लाख ४९ हजार रुग्ण आढळून आले असले तरी त्यापैकी ६ लाख १३ हजार जण एकट्या अमेरिकेतील आहेत. अमेरिकेत कोरोनाने मरण पावलेल्यांचा आकडा आता २६ हजारांवर गेला आहे. इटलीत कोरोनाने २१ हजार, तर स्पेनमध्ये १८ हजार ६०० झाला आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या अनुक्रमे १५ हजार ८०० आणि १२ हजार २०० आहे.

Web Title: The state is affected by 6,990 corona infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.