Join us

प्रवाशांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 5:31 AM

मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या आणि मुंबईतील पहिली मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ‘मेट्रो वन’ला नुकतीच ५ वर्षे पूर्ण झाली.

मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेल्या आणि मुंबईतील पहिली मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ‘मेट्रो वन’ला नुकतीच ५ वर्षे पूर्ण झाली. आता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून मेट्रो वनचा सर्व व्यवहार डिजिटल करण्याकडे भर देण्यात येणार आहे. भारतातील मेट्रो रेल्वे प्रकल्पातील हा पहिला खासगी सार्वजनिक प्रकल्प आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संचालित मुंबई मेट्रो वन गेली पाच वर्षे मुंबईकरांच्या सेवेत आहे. आतापर्यंत मुंबई मेट्रो वनच्या ६.१७ लाख फेºया झाल्या असून ५ कोटी ४० लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. येत्या काळात कॅशलेस, डिजिटल प्रयोग करून पाहिले जाणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि कर्मचाऱ्यांचे श्रम वाचतील.कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्यबळविकास अधिकाºयांशी, प्रशासकीय प्रमुखांशी मुंबई मेट्रो वनची टीम संपर्कात असते. नोकरदारांच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यासाठी, अधिकाधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी भर दिला जातो. त्यामुळे प्रवासी आपोआपच मेट्रो वनने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. आतापर्यंत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ४५० कॉर्पोरेट कंपन्यांच्या संपर्कात आहे. त्यातील ३ कंपन्यांचे २०० हून अधिक कर्मचारी पासघेतात.मेट्रोमध्ये खाण्याचे पदार्थ किंवा पेयनेल्याने अन्य प्रवाशांना अडचण किंवा त्रासहोतो. त्यामुळे मेट्रो कायद्यानुसार मेट्रोतखाद्यपदार्थ खाल्ल्यास तो गुन्हा ठरतो. असा गुन्हा केल्याचे आढळून आल्यास संबंधित प्रवाशाला ५०० रुपये दंड आकारला जातो. शिवाय खाद्यपदार्थ खाऊन रॅपर तिथेच टाकणे, मेट्रो खराब करणे असे प्रकारही घडू शकतात. प्रवाशांमध्ये स्वच्छतेची सवय अंगवळणी पडावी, हेच यामागचे उद्दिष्ट आहे.या मेट्रो मार्गावर मोबाइल तिकीट यंत्रणा आहे. तिला स्किप क्यू म्हटले जाते.प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. मोबाइलवरील क्यूआर कोडद्वारे ते तिकीट काढू शकतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी लिंक बेस्ड यंत्रणा मेट्रो स्थानकांवर विकसित केली आहे. पेमेंटसाठी प्रवाशांना त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अन्य कोणाच्याही हातात द्यावे लागत नाही. प्रवाशांना डिजिटलपेमेंट चांगल्या प्रकारे करता यावे यासाठीचआता आणखी अत्याधुनिक यंत्रणाविकसित करणे, प्रवाशांना जास्तीत जास्तसुविधा देणे याकडे लक्ष पुरविले जातआहे.वेळापत्रक कोलमडू नये यासाठी सतर्कता पाळली जाते. त्यासाठी देखभाल करणाºया कर्मचाºयांची प्रत्यक्ष रेल्वे लाइनवर नियुक्ती असते. ट्रेनमध्ये बिघाड झाला तर तो पटकन दूर केला जातो. मेट्रोचे वेळापत्रक बिघडू दिले जात नाही. तसेच फलाटावर समस्या उद्भवू नये यासाठी कर्मचारी तैनात असतात. ते नियोजनबद्ध काम करीत असल्यामुळेच वेळापत्रक रुळावरून घसरत नाही.