Join us

राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 6:40 AM

प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

मुंबई : प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. गुढीपाडव्यापासून (ता. १८) याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ज्या वस्तूंवर बंंदी घालण्यात आली त्यांची यादी शुक्रवारी विधिमंडळात सादर केली जाईल.>अंमलबजावणीसाठी समितीआतापर्यंत १५ मायक्रॉनपर्यंतच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी होती. आता ती सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर असेल. प्लास्टिकचे चमचे, प्लेट व अन्य कटलरी वस्तूंवरही बंदी असेल. परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.>प्लास्टिक बंदीमुळे मी अत्यंत आनंदित-  आदित्य ठाकरेअखेरीस मी आणि पर्यावरण मंत्री रामदासजी यांनी सुरू केलेल्या प्लास्टिक बंदीसंबंधीसाठीच्या प्रस्तावावर कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मी अत्यंत आनंदित आहे की सिंगल यूज प्लास्टिकवर केंद्रित केलेले प्रतिबंध लवकरच प्रभावी होतील. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हे आवश्यक होते. माझ्या विनंतीवर हा प्रस्ताव मंत्री मंडळापुढे मांडून मंजूर केल्याबद्दल मी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. प्रत्येक 6 महिन्यांनी एक अधिकार समिती बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तू तपासून त्याची अंमलबजावणी करतील.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी