Join us

फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका, उद्या पुन्हा होणार मंत्रिमंडळ बैठक ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 2:04 PM

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे

मुंबई - अवघ्या काही दिवसांवर आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राज्य मंत्रिमंडळाची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही जाहीर करू शकते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होईल, आचारसंहिता लागल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाहीत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकार काय महत्त्वपूर्ण घोषणा करतं ते पाहणे गरजेचे आहे. लोकप्रिय निर्णय घेऊन समाजातील घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाऊ शकतो. 

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यापीठ शिक्षकांना सातवा वेतन आयोग, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नामांतर करण्यास मान्यता, वृध्दाश्रमांना अनुदान असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मंगळवारी झालेल्या बैठकीत 22 निर्णय घेण्यात आले होते. शुक्रवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास 50 हून अधिक निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

टॅग्स :मंत्रालयदेवेंद्र फडणवीसमंत्रीमहाराष्ट्र