Join us

'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:34 AM

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

मुंबई- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक होत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली होती. त्यानंतर आज ट्विट करत साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांचा जीवनप्रवासही अनेक वळणं घेणारा होता. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. 

दरम्यान, ठाकरे गटांचे नेते, आमदार, खासदार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटाने स्मृतिदिनाच्या एक दिवस आधीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरे