राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ४,५८९ तर आतापर्यंत एकूण १८,९९,४२८ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के एवढे झाले आहे. सध्या ४६,७६९ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात बुधवारी ३,०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १९,९७,९९२ झाली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५०,५८२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५३ टक्के आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,३९,५७,४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९७,९९२ (१४.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१८,३२५ व्यक्ती होमक्वारंटाईन तर २,२३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात होते. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत यात घट होऊन ही संख्या १३,८०७ झाली आहे. तर पुण्यात ८,६८८ आणि मुंबईत ६,६५६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ५९ मृत्यूंमध्ये मुंबई ९, नवी मुंबई मनपा १, कल्याण-डोंबिवली मनपा २६, वसई-विरार मनपा १, रायगड १, पनवेल मनपा २, नाशिक मनपा १, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, पुणे ४, पुणे मनपा १, सोलापूर मनपा १, सातारा १, सांगली मिरज कुपवाड मनपा १, रत्नागिरी १, उस्मानाबाद १, बीड १, यवतमाळ १, नागपूर १, वर्धा १, भंडारा २ या रुग्णांचा समावेश आहे.
------------------