राज्यातील काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:13+5:302021-02-05T04:23:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रविवारी काेराेनाचे १,७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण १९ ...

In the state, the cure rate of carina is 95.18 percent | राज्यातील काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के

राज्यातील काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रविवारी काेराेनाचे १,७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण १९ लाख १२ हजार २६४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के एवढे झाले आहे. सध्या ४४,८३१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर २.५३ टक्के एवढा आहे.

राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० लाख ०९ हजार १०६ एवढी झाली असून बळींचा आकडा ५० हजार ७८५ एवढा आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४५ मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, मीरा-भाईंदर मनपा १, नाशिक १, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा १, पुणे १, पिंपरी चिंचवड मनपा १, सातारा ४, कोल्हापूर १, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ३, परभणी १, उस्मानाबाद १, बीड २,अमरावती मनपा १, वाशिम १, नागपूर ४, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती होमक्वारंटाइन, तरर २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

.............................

Web Title: In the state, the cure rate of carina is 95.18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.