राज्य नाट्य स्पर्धा: ‘अनन्या’ दुसऱ्या स्थानावर, ‘संगीत देवबाभळी’ ठरले सर्वोत्कृष्ट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:50 AM2018-05-03T05:50:55+5:302018-05-03T05:50:55+5:30

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ३०व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली

State drama competition: 'Ananya' was the second place, 'Deobabali music' was the best ...! | राज्य नाट्य स्पर्धा: ‘अनन्या’ दुसऱ्या स्थानावर, ‘संगीत देवबाभळी’ ठरले सर्वोत्कृष्ट...!

राज्य नाट्य स्पर्धा: ‘अनन्या’ दुसऱ्या स्थानावर, ‘संगीत देवबाभळी’ ठरले सर्वोत्कृष्ट...!

googlenewsNext

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ३०व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेचे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले आहे. या नाटकाला रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. सुधीर भट थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या ‘अनन्या’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक, तर त्रिकूट, मुंबई या संस्थेच्या ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
९ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिर आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १० व्यवसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्याम भूतकर, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, जयंत पवार आणि शकुंतला नरे यांनी काम पाहिले.

अंतिम फेरीतील काही पारितोषिके अशी
दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक : प्रताप फड (अनन्या)
द्वितीय पारितोषिक : प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी)
तृतीय पारितोषिक : स्वप्निल बारस्कर (अशी ही श्यामची आई)
नाट्यलेखन
प्रथम पारितोषिक : प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी)
द्वितीय पारितोषिक : अजित दळवी (समाजस्वास्थ)
तृतीय पारितोषिक : चैतन्य सरदेशपांडे (माकड)
प्रकाश योजना
प्रथम पारितोषिक : प्रफुल्ल दीक्षित (संगीत देवबाभळी)
द्वितीय पारितोषिक : भूषण देसाई (अनन्या)
तृतीय पारितोषिक : राजन ताम्हाणे (वेलकम जिंदगी)
नेपथ्य
प्रथम पारितोषिक : संदेश बेंद्रे (अनन्या)
द्वितीय पारितोषिक : प्रदीप मुळे (संगीत देवबाभळी)
तृतीय पारितोषिक : प्रसाद वालावलकर (अशी ही श्यामची आई)
संगीत दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक : आनंद ओक (संगीत देवबाभळी)
द्वितीय पारितोषिक : समीर साप्तीकर (अनन्या)
तृतीय पारितोषिक : अभिजीत पेंढारकर (अशी ही श्यामची आई)
उत्कृष्ट अभिनय
रौप्य पदक
पुरुष कलाकार
राहुल शिरसाट (माकड), सिद्धार्थ बोडके (अनन्या), अतुल पेठे (समाजस्वास्थ), मकरंद अनासपुरे (उलट सुलट), भरत जाधव (वेलकम जिंदगी).
स्त्री कलाकार
सोनाली मगर (माकड), शुभांगी सदावर्ते (संगीत देवबाभळी), अतिशा नाईक (अशी ही श्यामची आई), ऋतुजा बागवे (अनन्या), शिवानी रांगोळे (वेलकम
जिंदगी).

Web Title: State drama competition: 'Ananya' was the second place, 'Deobabali music' was the best ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.