Join us

Varsha Gaikwad: राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पंतप्रधान मोदींच्या कॅम्पेनचा हॅशटॅग वापरतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 6:12 PM

Pariskha Pe Charcha: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सोमवारी केली.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादर्भावामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सोमवारी केली. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील या संदर्भातील ट्विट केलं होतं. पण त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. (Education Minister Varsha Gaikwad Uses The Hashtag Of Prime Minister Modi Campaign Pariksha Pe Chara)

"महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती परीक्षा घेण्यासाठी योग्य नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे", असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. पण त्या ट्विटसोबत #PariskhaPeCharcha हा हॅशटॅग वापरला आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' अंतर्गत संवाद साधला होता. मोदींच्या या कार्यक्रमाच्या कॅम्पेनसाठी #PariskhaPeCharcha हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्यामुळे मोदींच्या कॅम्पेनसाठी वापरण्यात येणारा हॅशटॅग वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या घोषणेसाठी का वापरला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात तो चुकून वापरलाय की हा हॅशटॅग अलीकडेच ट्रेंडमध्ये आल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने वापरलाय, याबद्दल त्याच सांगू शकतील. 

टॅग्स :वर्षा गायकवाडनरेंद्र मोदीदहावी12वी परीक्षा