- खलील गिरकरमुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाच्या ३०० जणांची तुकडी लवकरच रुजू होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सध्या अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात ही तुकडी सेवेत रुजू होईल. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे काम अधिक प्रभावी होईल. या ३०० जणांमध्ये ३० टक्के म्हणजे सुमारे ९० महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागात आतापर्यंत दुय्यम निरीक्षक पदासाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे खात्यांतर्गत निवड करून विविध विभागांतील उमेदवारांना दुय्यम निरीक्षक म्हणून नियुक्ती दिली जात असे. त्यापैकी अनेकांना तात्पुरत्या स्वरूपाची बढती देऊन दुय्यम निरीक्षक म्हणून तैनात करण्यात येत असे. मात्र, आता एमएपीएसीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेऊन दुय्यम निरीक्षकांची मोठी तुकडी सेवेत येणार असल्याने दुय्यम निरीक्षक पदावर तरुण, उच्चशिक्षित अधिकारी कार्यरत होतील. सध्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे या अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू आहे. एकूण ३०० प्रशिक्षणार्थींमध्ये ९० महिला अधिकारी आहेत.सध्या प्रशासकीय सोय म्हणून विभागातर्फे क्लार्क , इतर कर्मचाºयांना तात्पुरती पदोन्नती देऊन त्यांची दुय्यम निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात येते. ही पदोन्नती तात्पुरती असल्याने ११ महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांची पुन्हा मूळ पदावर पदावनती करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून ही पद्धत अवलंबली जात होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.राज्यभरात ३९४ पदे रिक्तसध्या राज्य उत्पादन शुल्क विभागात राज्यभरात स्थायी पद्धतीची ४०८ व अस्थायी पद्धतीची ४२९ अशी दुय्यम निरीक्षकांची एकूण ८३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी स्थायी पद्धतीची ३१८ पदे व अस्थायी पद्धतीची १२५ पदे अशी एकूण ४४३ पदे भरलेली आहेत. तर, स्थायी पद्धतीची ९० पदे व अस्थायी पद्धतीची ३०४ अशी एकूण ३९४ पदे रिक्त आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग : लवकरच ३०० दुय्यम निरीक्षक रुजू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:42 AM